गूगल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गूगल

गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅकः GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.

गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी ७ सप्टेंबर|१९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५पासून सुंदर पिचाई यांची गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.

गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.

इंटरनेटवरील कोणतीही माहिती गूगल शोधून देऊ शकतो. गूगल हा एक लोकप्रिय ॲप आहे आणि लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात.

गूगल हे एक ॲप्लिकेशन आहे, अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे. गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की जी माहिती हवी आहे ते नीट समजून घेईल आणि नंतर मागणाऱ्याला पुरवेल.

गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरून हवी असलेली गोष्ट सर्च करतो. दिलेल्या शब्दांमधून तो तसेच शब्द कोणत्या वेबसाइटवर आहेत हे शोधतो. आणि रिजल्ट देतो.

आणि म्हणूनच जरी काही सर्च करताना व्याकरण चुकले तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही.

काही सर्च करायचे असेल गूगलवर तर मोजके शब्द लिहिले तरी काम होऊ शकते.

गूगलच्या दुसऱ्या सर्व्हिसचे नाव जीमेल आहे. जीमेल वापरून एखादा विनामूल्य ईमेल पाठवू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →