शोधयंत्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इंटरनेटावर/महाजालात माहितीचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या संकेतस्थळांना 'शोध यंत्र' (इंग्लिश:Search Engine) असे म्हणतात. एखादा कोणताही विशिष्ट शब्द किंवा शब्दसमूह ज्या-ज्या वेबपानांवरील मजकुरात असेल, अशी सर्व वेबपाने दाखवण्याचे काम शोधयंत्र करते. बहुतांश आधुनिक लोकप्रिय शोधयंत्रे ही केवळ मजकूरच नव्हे तर, एखाद्या शब्दासंबंधित चित्रे, चलचित्रे व इतर माहिती शोधण्यास मदत करतात. सर्वसाधारणपणे 'शोधयंत्र' ही संज्ञा फक्त इंटरनेटावरील माहिती शोधण्यासंदर्भात वापरली जाते; संगणकावर साठवलेल्या माहितीमध्ये शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरांना 'शोधयंत्र' म्हणले जात नाही.

महाजालात विविध प्रकारांची शोधयंत्रे वापरली जातात. अधिकाधिक लोक आपल्या वेबपानावर येणे हे शोधयंत्राने दिलेल्या स्थानांकनावर अवलंबून आहे; तसेच ते वेबपानाच्या शोधयंत्र मैत्रीपूर्णतेवरही अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →