गुलाबी मार्गिका (जयपूर मेट्रो)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

गुलाबी मार्गिका (जयपूर मेट्रो)

जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका ही भारतातील जयपूर शहरातील जलद वाहतूक प्रणालीचा एक भाग आहे. या मार्गिकेला जयपूरचा पूर्व-पश्चिम परिवहन मार्ग देखील म्हणतात. या ११.९७ किलोमीटर (७.४४ मैल) लांबीच्या मार्गिकेवर पश्चिमेकडील मानसरोवर पासून पूर्वेकडील बडी चौपर पर्यंत ११ मेट्रो स्थानके आहेत. बहुतेक स्थानक उन्नत आहेत आणि काही स्थानक भूमिगत आहेत.ही मार्गिका जयपूरच्या सर्वात जुन्या भागाला उर्वरित भागाशी जोडण्याचे काम करते.

ही मेट्रो मार्गिका ३ जून २०१५ रोजी सुरू झाली आणि ही लाईन पिंक सिटीमधून जात असल्याने तिला गुलाबी मार्गिका असे नाव देण्यात आले आहे.

या मारिकेची केशरी मार्गिकेसोबत जोडणी आणि अदलाबदल करण्याची योजना आखली गेली आहे. ही मार्गिका मानसरोवरला भारतीय रेल्वेच्या जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक, सिंधी कँप बस स्थानक, हवा महल, टाउन हॉल, जंतरमंतर, सिटी पॅलेस या वारसा स्थळांशी जोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →