जयपूर मेट्रो ही भारतातील राजस्थानच्या जयपूर शहरासाठी असणारी एक जलद परिवहन प्रणाली आहे.मानसरोवर ते चांदपोलबाजार या पहिल्या टप्प्याचे बांधकाम १३ नोव्हेंबर २०१०ला सुरू झाले.हा टप्पा ९.६३ किमी लांबीचा आहे. हे बांधकाम सन २०१४ मध्ये पूर्ण झाले. कमिश्नर ऑफ मेटो रेल सेफ्टी यांची मंजूरी मिळाल्यावर, या मेट्रोची सेवा ३ जून २०१५ मध्ये मानसरोवर ते चांदपोल या मार्गावर प्रत्यक्षात सुरू झाली.कोलकाता मेट्रो, दिल्ली मेट्रो, बंगळूरू मेट्रो, गुरगाव मेट्रो व मुंबई मेट्रोनंतरची ही भारतातील सहावी मेट्रो रेल्वे सेवा आहे. तसेच, तीन मजली उन्नत रस्ता व मेट्रो मार्गिका असणारी ही भारतातील प्रथमच मेट्रो सेवा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयपूर मेट्रो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?