गवळी

या विषयातील रहस्ये उलगडा.

गवळी (गौ-पालन करणारा) दुभत्या जनावरांची निगा राखून, त्यांचे दूध काढून, दुधाचा व तत्सम दुग्धजन्य पदार्थांचा (लोणी, तूप, खवा, पनीर इत्यादी) व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस गवळी असे म्हणतात.

महाराष्ट्रातील हिंदू-गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गोपालन (गाय) व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे.गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत, "गवळी" ही "यादव" समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळा शी जोडला जातो आणि भगवान श्रीकृष्णा चे वंशज मानले जाते.

महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना गवळी हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली

देवगिरीचे यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७), यांना सेवुण/सेऊण राजवंश असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →