गंगापूर तालुका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गंगापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. गंगापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

या तालुक्याच्या उत्तरेला कन्नड तालुका आहे. पश्चिमेला वैजापूर तालुका तर आग्नेय दिशेला पैठण तालुका आहे. ईशान्येला खूल्ताबाद तालुका आहे. गंगापूरच्या पूर्वेला जिल्हा मुख्यालय छत्रपती संभाजीनगर तालुका आहे. दक्षिणेला अहमदनगर जिल्हा आहे. गंगापूर - खूल्ताबाद विधानसभाचे आमदार मा. प्रशांत बंब आहे. तालुक्यातून शिवणा,गोदावरी , खाम ,प्रवारा ,मार्तेडंय ह्या नद्या वाहतात.

लासूर येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण भागातील बाजारपेठ आहे. लासूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. याची लोकसंख्या १ लाख ३२ हजार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →