छत्रपती संभाजीनगर जिल्हा (पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा) हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मुख्य शहर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आहे. येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीके - कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या - गोदावरी, तापी, पूर्णा ह्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ टेकड्या - म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी ह्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.