वैजापूर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वैजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. एका शेतकऱ्या च्या शेतात नांगरत असतानां वैजनाथ महादेवाची पिंड सापडली त्या पिंडीवरून गावाचे नाव वैजापूर देण्यात आले. MH57 वैजापूर हे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अदमासे ७३ कि.मी. अंतरावर नारंगी-सारंगी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. वैजापूर शहर नारंगी नदिकिनारी वसलेले आहे. वैजापूर डेक्कन पठाराच्या पश्चिम घाटावर स्मुद्रसापातीपासून ५१४ मी.(१६६६फुट) लांब आहे. वैजापूर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी नारंगी-सारंगी जंक्शन आहे. वैजापूर शहराच्या पश्चिमेला नाशिक जिल्हा आहे. तर उत्तरेस कन्नड तालुका आहे. पूर्वेस गंगापूर तालुका आहे आणि दक्षिणेस अहमदनगर जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →