नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' (गुरुग्रंथ) ह्या ग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत शेष घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन (Lift Irrigation) प्रकल्प येथे आहे.
नांदेड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.