ओतूर

या विषयावर तज्ञ बना.

ओतूर हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. या गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथून अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदिर ८ किलोमीटरवर आहे. शिवनेरी किल्ला ओतूरहून २० किलोमीटर दूर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे. ओतूरपासून जवळ डुंबरवाडी व खामुंडीच्या शीवेवर सोमनाथाचे प्राचीन देउळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →