खोत हा ब्रिटिश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा गोळा करून तो सरकारला देत असे.
खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
खोताची वाडीत-गावात मोठी वट असते, वाडीतील अतीमहत्त्वाची दैविक कामे करण्याची ताकद त्यांच्यात असते व त्यांचा तो परंपरागत हक्क असतो. गावात मोठा मान व आदर खोताला मिळत असे.
खोत
या विषयावर तज्ञ बना.