खोती पद्धत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा ब्रिटिश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार, वतनदार असाही होतो.



खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी पिढ्यांपिढ्या गांजले होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. कोकणातील तत्कालीन शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड,दापोली, तळा, रोहा, खेड इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता. शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.

शेतकरयांच्या लढयामुळे त्यावेळी अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली असली तरी पुढच्या पिढीला या आंदोलनामुळे अच्छे दिन आले. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →