गंगाधर गाडे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गंगाधर गाडे हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते असून पॅंथर रिपब्लिक पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय बौद्ध नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचे एक प्रमुख नेते होते. ७ जुलै १९७७ रोजी दलित पॅंथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती. इ.स. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला गेला.सूर्यकांता गाडे ह्या गंगाधर गाडेंच्या पत्नी तर सिद्धांत गाडे हे पुत्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →