मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

या विषयावर तज्ञ बना.

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो. हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →