चंद्रकांत खोत (जन्म : भीमाशंकर, ७ सप्टेंबर १९४०; मुंबई, १० डिसेंबर २०१४) हे एक मराठी लेखक, कवी आणि संपादक होते.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांच्याच मूळ गावातून येणाऱ्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर प्रबंध लिहून पीएच.डी.ची पदवी मिळवली होती.
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबऱ्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.
चंद्रकांत खोत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.