खुलना (बंगाली: খুলনা বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस पश्चिम बंगाल राज्याचे उत्तर २४ परगणा व दक्षिण २४ परगणा हे जिल्हे; दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर दोन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. खुलना विभागाचा बराचसा भूभाग गंगा त्रिभुज प्रदेशाने व्यापला आहे. त्याचबरोबर सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल ह्याच विभागामध्ये आहे. खुलना नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली खुलना विभागाची लोकसंख्या सुमारे १.५७ कोटी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खुलना विभाग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.