बारिसाल (बंगाली: বরিশাল বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बंगालचा उपसागर तर इतर तीन दिशांना बांगलादेशाचे इतर विभाग आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने बांगलादेशमधील सर्वात कमी लोकवस्ती असलेला ह्या विभागामधून अनेक नद्या वाहतात. बारिसाल नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली बारिसाल विभागाची लोकसंख्या सुमारे ८३ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बरिशाल विभाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!