मयमनसिंह (बंगाली: ময়মনসিংহ বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस भारताचे मेघालय राज्य इतर दिशांना बांगलादेशचे इतर विभाग आहेत. २०१५ साली ढाका विभागाचे विभाजन करून ह्या नव्या विभागाची निर्मिती करण्यात आली. मयमनसिंह नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली मयमनसिंह विभागाची लोकसंख्या सुमारे १.१३ कोटी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मयमनसिंह विभाग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.