राजशाही विभाग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

राजशाही विभाग

राजशाही (बंगाली: রাজশাহী বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस भारताचे पश्चिम बंगाल राज्य तर उर्वरित दिशांना बांगलादेशचे इतर विभाग आहेत. २०१० साली राजशाही विभागाचे विभाजन करून नव्या रंगपूर विभागाची निर्मिती करण्यात आली. राजशाही नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली राजशाही विभागाची लोकसंख्या सुमारे १.८५ कोटी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →