खुलना हे बांगलादेशाच्या खुलना विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. खुलना शहर बांगलादेशच्या दक्षिण भागात राजधानी ढाकाच्या ३०० किमी दक्षिणेस वसले आहे. २०२१ साली सुमारे ९.५ लाख लोकसंख्या असलेले खुलना ढाका व चित्तगाँग खालोखाल देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. खुलना शहर गंगा नदीच्या त्रिभूज प्रदेशामध्ये पसरलेल्या विशाल सुंदरबनचे प्रवेशद्वार मानले जाते. बागेरहाटचे मशिदी शहर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान खुलनाच्या दक्षिणेस आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खुलना
या विषयातील रहस्ये उलगडा.