क्वेसार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

क्वेसार

क्वेसार (इंग्रजी: Quasar) किंवा क्वाझी स्टेलार रेडिओ स्रोत हे सक्रिय दीर्घिकीय केंद्रके या वर्गातील वस्तूंमधले सर्वात शक्तिशाली आणि दूरवरचे सदस्य आहेत. क्वेसार अत्यंत तेजस्वी असतात. ते सुरुवातीला दीर्घिकांसारख्या विस्तृत स्रोतांऐवजी उच्च ताम्रसृतीवरील विद्युतचुंबकीय ऊर्जेचे ताऱ्यांसारखे स्रोत म्हणून ओळखले गेले. म्हणून त्यांना क्वाझी स्टेलार असे नाव पडले. क्वेसारची तेजस्विता आकाशगंगेपेक्षा १०० पट जास्त असू शकते. या वस्तूंचे खरे स्वरूप १९८० पर्यंत माहित नव्हते. परंतु आता वैज्ञानिक समुदायात असे मानले जाते की क्वेसार हा प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर केंद्रस्थानी असलेल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचा दाट भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →