क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे. क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.
क्वांटास
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.