निॲन्दरथल मानव हा प्रगत मानवाचा पूर्वज आहे. या वंशाच्या जवळजवळ चारशे मानवाचे अवशेष आतापर्यंत शोधले गेलेले आहेत. याचे अस्तित्त्व इ.स.पू. ४०००० ते इ.स.पू. २०००० वर्षे या कालखंडात होते.
निॲन्दरथल मानवाचे कपाळ सरळ उभे नसून तिरपे, भुवयाची हाडे वाढलेली, खालचा जबडा भक्कम परंतु हनुवटी न दाखविणारा आणि डोक्याची कवटी किंचित मागे वाढलेली होती. याचा मेंदू सध्याच्या मानवापेक्षा मोठा होता. निॲन्दरथल मानव हुषार होता व दगडी हत्यारे उत्तम बनवीत होता. फ्रान्समधील ल मुस्तिए या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निॲन्दरथल मानवाने बनविलेली दगडी हत्यारे सापडली असून त्यावरून हा मानव गोफणीचे दगड, तासण्या व दगडी चाकूची पाती वापरीत होता असे दिसून आले आहे.
निअँडरथाल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?