क्रो-मॅग्नन मानव हा प्रगत मानवाचा पूर्वज आहे. फ्रान्समध्ये क्रो-मॅग्नन नावाच्या गुहेमध्ये इ.स. १८६८ साली सर्वप्रथम या मानवाचे अवशेष सापडले. त्यानंतर इ.स. १८७२ ते इ.स. १९०२ या कालखंडात फ्रान्सबरोबर इटलीमध्येही या मानवाचे अवशेष सापडले. या मानवाचा कालखंड इ.स.पू. ३०००० वर्षे ते इ.स.पू. १३००० वर्षे समजला जातो पण क्रोमॅग्नन मानवाचा उपलब्ध सर्वात प्राचीन अवशेष कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीनुसार इ.स.पू. ४३००० वर्षे इतका प्राचीन आहे.
क्रोमॅग्नन मानव साधारणपणे ५ फूट ११ इंच उंचीचा असून त्याच्या कवटीची क्षमता १६०० क्यूबिक सेंटीमीटर होती. सरळ नाक, उंच कपाळ आणि दणकट जबडा ही या मानवाची वैशिष्ट्ये होती. हा मानव गुहेमध्ये राहत असे व तिथे उत्कृष्ट रंगीत चित्रे काढीत असे. फ्रान्समधील दोर्गोन्य विभागातील मॉंतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात असलेल्या लास्को गुहेत क्रोमॅग्नन मानवाने काढलेली उत्कृष्ट चित्रे असून इ.स. १९७९ साली युनेस्कोने या गुहेचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.
क्रो-मॅग्नन मानव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.