क्वेबेक सिटी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

क्वेबेक सिटी

क्वेबेक ही कॅनडा देशातील क्वेबेक ह्या प्रांताची राजधानी आहे. मॉंत्रियाल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे.

पर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्वेबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्वेबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.

अल्गॉन्किन भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्वेबेक या शब्दाचा अर्थ आहे. क्वेबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान सेंट लॉरेन्स ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्वेबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्वेबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.

क्वेबेक शहर तिथल्या उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिद्ध आहे. "कार्निव्हल" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. "शातो फ्रोंतनाक" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, "म्युझे दला सिव्हिलिझास्यॉं", "म्युझे दे बोझार" ही इथली प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, "मॉन्टमोरेन्सी" नावाचा धबधबा आणि "सेन्ट ऍन द बोप्रे" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.

येथे फ्रेंच भाषकांचे बहुमत असून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →