हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्नच्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण).
मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणाऱ्या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानीच्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे.
या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते.
मेलबर्न
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.