कोर्टेझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. माँटेझुमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या कोर्टेझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ८,७६६ होती.
या शहराला स्पॅनिश काँकिस्तादोर एर्नान कोर्तेसचे नाव देण्यात आले आहे. मेसा व्हर्डे राष्ट्रीय उद्यान, फोर कॉर्नर्स आणि मॉन्युमेंट व्हॅली येथून जवळ आहेत. याशिवाय क्रो कॅन्यन पुरातत्त्वीय केन्द्र, कॅन्यन ऑफ द एन्शंट्स राष्ट्रीय स्मारक आणि होवेनवीप राष्ट्रीय स्मारक ही प्राचीन स्थळे या प्रदेशात आहेत.
कोर्टेझ (कॉलोराडो)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.