कोयना वन्यजीव अभयारण्य

या विषयावर तज्ञ बना.

कोयना वन्यजीव अभयारण्य

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे.



इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे.

अभयारण्याचे याचे एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.

या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकार प्रयत्‍नशील आहे.

इतिहास:

वर नमूद केल्याप्रमाणे हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महारखोरे, वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे, कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे. अभयारण्याच्या पश्चिमेकडे नदीच्या एका बाजूला सह्याद्रीची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूस सह्याद्रीची उपरांग आहे. या दोन्ही रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९० अंशाचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच कडा जो बाबू कडा नावाने ओळखला जातो, तो येथे आहे. अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे उंची साधारणपणे ११०० मीटर.

एकाबाजूला नैसर्गिक कडा व दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे. कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात वाहतात. जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५००० मिमी इतकी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →