कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे.
कोस्टा रिका
या विषयातील रहस्ये उलगडा.