कोपनहेगन विमानतळ (डॅनिश: Københavns Lufthavn) (आहसंवि: CPH, आप्रविको: EKCH) हा डेन्मार्क देशाच्या कोपनहेगन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कोपनहेगन शहराच्या ८ किमी दक्षिणेस व स्वीडनच्या माल्म शहराच्या २४ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. ओरेसुंड पूलाद्वारे हा विमानतळ स्वीडन देशासोबत देखील जोडला गेला आहे.
एप्रिल १९२५ मध्ये खुला करण्यात आलेला कोपनहेगन विमानतळ हा जगतील सर्वात जुन्या नागरी विमानतळांपैकी एक आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच स्थित आहे.
कोपनहेगन विमानतळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.