शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ

शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVG, आप्रविको: ZSPD) हा चीन देशाच्या शांघाय शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता. पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत शांघाय मॅग्लेव्ह रेल्वेद्वारे जोडण्यात आला आहे. ४३१ किमी/ता (२६८ मैल/तास) इतक्या वेगाने प्रवास करणारी ही रेल्वे सध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव मॅग्लेव्ह रेल्वेगाडी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →