लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJL, आप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ व मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फाल व गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.
लेंगपुई विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.