कैलाश मेहेरसिंह खेर (जन्म : मीरत-उत्तर प्रदेश, ७ जुलै इ.स. १९७३) हा एक भारतीय गायक आहे. मीरत येथे जन्मलेल्या खेरने २००१ साली मुंबईला स्थानांतर केले व संगीत सृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००३ सालच्या अंदाज चित्रपटामध्ये त्याने जे एक गाणे म्हणले ते लोकप्रिय झाले. त्यानंतर स्वदेस, मंगल पांडे, सरकार इत्यादी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करून तो प्रसिद्धीस आला. कैलाश सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक असून त्याला २००७ सालचा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कैलाश खेर
या विषयावर तज्ञ बना.