के.टी. थॉमस (न्यायाधीश)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

के.टी. थॉमस (न्यायाधीश)

कल्लूपुराक्कल थॉमस थॉमस (जन्म ३० जानेवारी १९३७) हे एक भारतीय माजी न्यायाधीश आहेत ज्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सेवा बजावली. त्यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा कायम केली.

र्थॉस यांचा जन्म ३० जानेवारी १९३७ रोजी कोट्टायम जिल्ह्यात झाला. त्यांनी मद्रास लॉ कॉलेजमध्ये (सध्याचे डॉ. आंबेडकर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चेन्नई) कायद्याचे शिक्षण घेतले. १९६० मध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि कोट्टायम येथे, त्या काळातील एक प्रख्यात वकील जोसेफ मालियाकल यांच्या हाताखाली कनिष्ठ वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर लवकरच, त्यांनी कोट्टायम जिल्हा न्यायालयात आणि पुढे केरळ उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली. १९७७ मध्ये, निवड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांची थेट 'जिल्हा आणि सत्र न्यायाधीश' म्हणून निवड झाली. १९८५ मध्ये त्यांची केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आणि १९९५ मध्ये त्यांनी कार्यवाहू मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. १९९६ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. वकील म्हणून कार्यरत असताना, १९७६ मध्ये अमेरिकेतील टेक्सास येथे आयोजित 'जागतिक शांतता परिषदे'त त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. तसेच, या परिषदेत स्थापन करण्यात आलेल्या आयोगांपैकी एका आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

सेवानिवृत्तीनंतर २००७ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०११ पासून त्यांनी ठाम सार्वजनिक भूमिका घेतल्या आहेत, जसे की महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी आरएसएसला दोषमुक्त म्हणने आणि मृत्युदंडाला विरोध करणे. त्यांना भारत सरकारतर्फे २०२६ मध्ये सामाजिक कार्यांच्या क्षेत्रातील सेवेबद्दल सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →