कॅथे ड्रॅगन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हॉंगकॉंग ड्रॅगनएर एरलाइन्स लिमिटेड ही हाँग काँगस्थित आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी कॅथे ड्रॅगन नावाने धंदा करते. या कंपनीचे पूर्वीचे नाव ड्रॅगनएर होते संपूर्णपणे कॅथे पॅसिफिकच्या मालकी असलेल्या कॅथे ड्रॅगनचे कॉर्पोरेट मुख्यालय कॅथे ड्रॅगन हाऊस आणि मुख्य केंद्र हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. ३० ऑक्टोबर २०१३ च्या माहितीनुसार ही विमानकंपनी आशियातील ४४ शहरे आणि १३ देशांमध्ये प्रवासी सेवा पुरवित आहे. तसेच कंपनीची ३ मित्रकंपन्यांद्वारे इतर मार्गांवर सेवा देते. कॅथे ड्रॅगनकडे एरबसच्या ४१ विमानांचा ताफा आहे, ज्यात ए-३२०, ए-३२१, ए-३३० आणि बोईंगच्या ७४७ (कार्गो) विमानांचा समावेश आहे. कॅथे ड्रॅगन ही वन वर्ल्ड विमानसंघाची संलग्न सदस्य आहे. या कंपनीची स्थापना २४ मे, १९८५ रोजी चाओ कुआंग पीउ यांनी केली. ते सध्या कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत. जुलै १९८५ मध्ये हवाई वाहतुकीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर कंपनीने पहिल्यांदा कोटा किनाबलु, मलेशिया या शहराला पहिले उड्डाण केले. २०१० पर्यंत ड्रॅगनएर आणि तिची मुख्य कंपनी कॅथे पॅसिफिकच्या मिळून १,३८,००० उड्डाणे, जवळपास २ कोटी ७० लाख प्रवाशांची आणि १.८ अब्ज कि.ग्रॅ. पेक्षा जास्त मालाची वाहतूक झालेली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →