कृष्णा गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळतो. याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८०नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट जमिनीच्या मशागतीसाठी तत्कालीन मराठा राजांनी गीर, कांकरेज आणि ओंगल या भारतीय गोवंशाच्या देशी संकर आणि निवड पद्धतीने या गोवंशाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. हा गोवंश अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या भारतीय गोवंशापैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णा गाय
थोडक्यात पण महत्त्वाचे.