कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुशीनगर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.