नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगिकारला होता. १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या लोकांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात. या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून आलेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवबौद्ध चळवळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.