शाक्य (साक्य) हे भारतीय उत्तर वैदिक काळातील क्षत्रिय कूळ होते. बौद्ध धम्मग्रंथ बुद्धवंश नुसार शाक्य हे इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय होते (१ मिलेनियम इ.स.पू.). शाक्य कुळाचे जीवनक्षेत्र मगधमध्ये (सध्याचे नेपाळ आणि उत्तर भारत येथे), हिमालयाजवळ होते.शाक्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याला शाक्य गणराज्य म्हणून ओळखले जाई. त्याची राजधानी कपिलवस्तू होती. ती एकतर नेपाळच्या तिलाउरकोट येथे किंवा भारतातील आजच्या पिप्राहवा येथे असावी.
ज्यांची शिकवण बौद्ध धर्माचा पाया बनली तो गौतम बुद्ध (इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक) हा सर्वात प्रसिद्ध शाक्य होता. त्याच्या पूर्वायुष्यात तो "सिद्धार्थ गौतम" आणि "शाक्यमुनी" (शाक्यांचे ऋषी) म्हणून परिचित होता त्याचे वडील शुद्धोधन हा शाक्यांचा सम्राट होता.
शाक्य
या विषयावर तज्ञ बना.