साल (वृक्ष)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शोरिया रोबस्टा, साल वृक्ष, डिप्टेरोकारपेसी कुळातील झाडाची एक प्रजाती आहे.

हे झाड मूळतः भारतीय उपखंडातील आहे, हे हिमालयाच्या दक्षिणेस, पूर्वेस म्यानमार पासून नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत आढळते. भारतात ते, आसाम, बंगाल, ओडिशा आणि झारखंडपासून पश्चिमेकडील हरियाणामधील शिवालिक टेकड्यांपर्यंत, यमुनेच्या पूर्वेस पसरलेले आहे. त्याचे क्षेत्र पूर्व घाट आणि पूर्वे कडील विंध्य आणि मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगा पर्यंत आहे. ज्या जंगलात हे वृक्ष आढळते तेथील प्रमुख वृक्ष ह्याचेच असतात. नेपाळमध्ये, ते मुख्यतः पूर्व ते पश्चिमेकडील तराई प्रदेशात आढळते, विशेषतः, उप-उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रातील शिवलिक पर्वत रांगा (चुरिया रेंज) मध्ये आढळते. चितवन नॅशनल पार्क, बर्डिया नॅशनल पार्क आणि शुक्ला फाट वन्यजीव राखीव अशी अनेक संरक्षित क्षेत्रे आहेत जिथे प्रचंड सालच्या झाडाची घनदाट जंगले आहेत. हे वृक्ष डोंगराळ प्रदेश आणि अंतर्गत तेराईच्या खालच्या पट्ट्यातही आढळते.

मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंडसह उत्तर भारतात सालच्या झाडाला साखुआ म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगड आणि झारखंड या दोन भारतीय राज्यांचा साल हा राज्य वृक्ष आहे.

साल हा मध्यम ते संथ वाढीचा वृक्ष असून तो 30 ते 35 मीटर पर्यंत उंची आणि 2-2.5 पर्यंत मध्य व्यास गाठू शकतो त्याची पाने 10-25 सेमी लांब आणि 5-15 सेंमी रुंद असतात. अतिवृष्टी असलेल्या प्रदेशात, साल सदाहरित असतो; कोरड्या प्रदेशामध्ये साल वृक्ष फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान पानगळीचे गुणधर्म दाखवितो आणि एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा नवीन पालवी येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →