नागचाफा किंवा नागकेशर हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले व कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागचाफा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?