परिनिर्वाण स्तूप हा उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर येथील एक बौद्ध विहार आहे. हे ठिकाण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे. याला महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही संबोधिले जाते.
अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, व गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध केले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग)च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत उत्तर दिशेला उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने निद्रावस्थेत पडलेली दिसते. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडी पलंगावर ठेवलेला आहे.
परिनिर्वाण स्तूप
या विषयातील रहस्ये उलगडा.