महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्त्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु इ.स. २०१३ मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायादेवी विहार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!