कुचिपुडी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कुचिपुडी

कुचिपुडी ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे. हिला 'अट्ट भागवतम' असेही म्हणले जाते.

आंध्र प्रदेशातील या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. १५१० ते १५३० या काळात झाला. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापूर्वी या कलेचा उगम झाला असून आंध्र प्रदेशातील भागवतार ब्राह्मणांकडून हे नृत्य सांभाळले गेले. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. सहाव्या शतकातील भक्तिसंप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या कलाप्रकाराचे विशेष योगदान आहे. कुचिपुडी या गावात रामायणातील कथा या गीत,नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत. त्यांना 'कुशीलव' असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरूष पात्रांचा सहभाग असतो. भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीचा समन्वयही या नृत्यप्रकारात साधला गेलेला दिसतो. सतराव्या शतकात सिद्धेन्द्र योगी यांनी कुचिपुडी गावातील युवकांना बरोबर घेऊन हा कलाप्रकार जगासमोर आणला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →