ओडिसी नृत्य ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय.‘त्रिभंग’ स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. ओडिसीच्या सध्याच्या स्वरूपात बाराव्या शतकात जयदेवाने लिहिलेल्या गीतगोविंदाची पदे प्रामुख्याने वापरली जातात.
बुधकालीन सहजयान आणि वज्रयान शाखांच्या सौंदर्यप्रधान साधनेतून या शैलीचा उदय झाला असे मानले जाते.भरतनाट्यम् आणि कथक या नृत्यप्रकारांचे मिश्रण यात दिसते.बौद्ध,शैव,वैष्णव, ब्राह्मण आणि शाक्त या संप्रदायांचे संस्कार या शैलीवर दिसून येतात.कवी जयदेवाची अष्टपदी यामध्ये प्रामुख्याने गायली जाते. कोणार्क येथील सूर्य मंदिर तसेच जगन्नाथपुरी येथील मंदिर हे या नृत्याची आधारभूमी मानले जातात.
ओडिसी नृत्य
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.