काणकोणची कोकणी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गोव्यातील काणकोण या गावाच्या आसपास बोलली जाणारी काणकोणची कोकणी ही एक मराठी भाषेची स्वतंत्र बोली आहे. तिथले श्रीमंत हिंदू शेतकरी ही बोली बोलतात. गोव्यातीलच शेतमजुरांची बोली, ख्रिश्चनांची बोली, गावड्यांची बोली किंवा कारवारी या बोलींपेक्षा काणकोणची कोकणी भिन्‍न आहे.



केवळ नाकात उच्चारल्याने काही शब्दांचे अर्थ बदलतात

उदा०

दाताक - एका दाताला; दातांक - अनेक दातांना

न्हयिक - नदीकडे; न्हयिंक - नदीमध्ये

निडलो - (तो) झोपला; निडलों - (मी) झोपलो

निडले - (आम्ही/तुम्ही/ते) झोपले; निडलें - (मी) झोपले



’ओ’च्या जागी ’ऑ’ उच्चारल्याने अर्थ बदलतात

उदा०

पोट - गर्भ; पॉट - पोट

फोड - फोड (मोठी पुटकुळी); फॉड - (नागाचा) फणा

कोळसो - कोळसा; कॉळसो - कळशी

तोड - तोडगा; तॉड - (लाकडाचा) ओंडका

बोट - जहाज; बॉट - (हाताचे किंवा पायाचे) बोट



काही सर्वनामे



हाव - मी

मका/म्हाका - मला

मागे - माझा, माझे, माझ्या

तूं - तू

तुक - तुला

तुगे - तुझा, तुझे, तुझ्या

तेका - त्याला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →