तंजावर मराठी ( तमिळ: தஞ்சாவூர் மராட்டி (लिप्यंतरः तंजावूर मराट्टि); रोमन लिपी: Thanjavur Marathi / Tanjore Marathi ) ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाते. जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात.
तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव ह्या भाषेवर जाणवतो.
तंजावूर मराठी बोलीभाषा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.