अहिराणी ही खानदेश प्रदेशात बोलली जाणारी पश्चिम हिंद-आर्य भाषा आहे व ती देवनागरी लिपीत लिहिली जाते. ही भाषा तिच्या प्रादेशिक नावावरून खानदेशी म्हणूनही ओळखली जाते तर ती मूळ अहिर लोकसमूहाची भाषा असल्या कारणाने ती अहिराणी म्हणून ओळखली जाते.
अहिराणी भाषा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम भागात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात बोलली जाते. महाराष्ट्राव्यतिरीक्त गुजरातच्या सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या पानसेमल, सेंधवा या तालुक्यांतही अहिराणी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गुजरातमधील डांग जिल्ह्यात बोलली जाणारी डांगी(डांगरी) ही सुद्धा खानदेशीचीच एक बोली म्हणून वर्गीकृत केली जाते.
१९११, १९२१ आणि १९३१ च्या जनगणनेत अहिराणी भाषिक लोक गुजराती म्हणून गणले गेले. परंतु नंतरच्या काळात खानदेशी एक स्वतंत्र भाषा म्हणून गणली जाऊ लागली.
अहिराणी बोलीभाषा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!