कांचनमाला विनोद पांडे-देशमुख (जन्म:३१ डिसेंबर १९९०) (पूर्वाश्रमीची कांचनमाला ज्ञानेश्वर पांडे) ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरणपटू आहे. तिचे वडील ज्ञानेश्वर पांडे हे हॉकीपटू आहेत. कांचनमाला आंधळी आहे, पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा झुगारून तिने जिद्दीने वयाच्या १० व्या वर्षांपासून पोहायला सुरुवात केली. ती केवळ ८ दिवसात पोहणे शिकली व तिने खुल्या गटात भाग घेऊन आपली गुणवत्ता दाखविली. वयाच्या ११वे वर्षी तिने सात किमी समुद्री अंतर १४ मिनिटात पार करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदविले. तिने मेक्सिको येथे झालेल्या पॅरा जागतिक जलतरणस्पर्धेत, तिच्या गटात सुवर्णपदक जिंकले. तिने हे सुवर्णपदक २०० मीटर वैयक्तिक मिडले गटात राहून मिळविले.ती नेत्रहीन आहे. कांचनमाला भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एकलारा येथे राहते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कांचनमाला पांडे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?