कलिंगचे युद्ध

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कलिंगचे युद्ध

कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते. कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सुरुवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते. सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →